अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अनेक दावे करण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत या हत्येतील एकूण सात आरोपींना अटक केली. त्यात या हत्येचा सुत्रधारही आहे. आता या हत्याप्रकरणाला नवे वळण आले आहे. सात आरोपींमधील एक आरोपी युसुफ खान हा उमेश कोल्हे यांचा मित्र असल्याचे समोर आले आहे. त्याचे उमेश कोल्हे यांच्याशी घरगुती संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उमेश कोल्हे हत्याप्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट व्हाॅट्सअॅप ग्रुप मध्ये शेअर केली होती. त्याच ग्रुपमध्ये युसुफ खान होता. त्याने ती पोस्ट दुस-या मुस्लिम ग्रुपमध्ये शेअर केली. त्यानंतर या हत्येचा सुत्रधार इरफान खान याने हत्येचा कट रचला आणि याबाबत सगळी कल्पना युसुफ खान याला असूनही त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे भासवले, तसेच तो उमेश कोल्हे यांच्या अंत्यविधीतही सहभागी झाला होता.
( हेही वाचा: माळढोक पक्षापाठोपाठ तणमोर पक्षाच्याही अस्तित्वाला धोका )
मेडिकलमधून घरी जात असताना झाली हत्या
कोल्हे हत्याकांड प्रकरणाचा तपास सध्या NIA आणि ATS कडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच न्याय मिळेल अशी कोल्हे कुटुंबीयांना अपेक्षा आहे. कोल्हे यांचे स्वत:चे मेडिकल स्टोअर आहे. 21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना, या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले.
Join Our WhatsApp Community