Women’s Reservation Bill : अमूलने खास डुडल बनवून महिला आरक्षण विधेयकाचं केलं स्वागत

केंद्रसरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून या आठवड्यात महिला आरक्षण विधेयक पास करून घेतलं.

275
Women’s Reservation Bill : अमूलने खास डुडल बनवून महिला आरक्षण विधेयकाचं केलं स्वागत
Women’s Reservation Bill : अमूलने खास डुडल बनवून महिला आरक्षण विधेयकाचं केलं स्वागत
  • ऋजुता लुकतुके

अमूल या गुजरातमधील गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या डेअरी उद्योगाने एक खास डूडल बनवून महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत केलं आहे. केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून या आठवड्यात महिला आरक्षण विधेयक पास करून घेतलं. दोन्ही सभागृहांमध्ये या विधेयकाला मान्यताही मिळाली. त्यानंतरचे दिवस हा क्षण साजरा करण्याचे आहेत. सोशल मीडियावर या विधेयकावरून सरकारचं कौतुकही होतंय. आता अमूल या डेअरी कंपनीने आपल्या खास डूडलच्या माध्यमातून या विधेयकाचं स्वागत केलं आहे. ‘अमूल बहुसंख्यांचं लाडकं आहे,’ असं हे डूडल सांगतं.

(हेही वाचा – Monsoon : पुणे शहरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवस अलर्ट जारी)

संसदेच्या या विशेष अधिवेशनात नवीन संसद इमारतीचंही उद्घाटन झालं. आणि महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत करण्यासाठी सामाजिक वर्तुळातील काही लोक तसंच बॉलिवूड अभिनेत्रीही दिल्लीत पोहोचल्या. कंगना रनौत, तमन्ना भाटिया, दिव्या दत्ता आणि भूमी पेडणेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतानाच या विधेयकाचं स्वागत केलं आहे. ‘महिला आरक्षण विधेयक ही खूप चांगली सुरुवात आहे. महिला त्यामुळे भारतीय राजकारणात पुढे येतील. शिवाय संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहून असा इतिहास घडताना पाहणं, हा तर खूपच अविस्मरणीय अनुभव होता,’ असं अभिनेत्री दिव्या दत्ताने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘महिला सक्षमीकरणाचा मुद्दा पंतप्रधानांनी अग्रक्रमाने मांडला. नवीन संसदभवनात पहिलंच विधेयक महिला आरक्षणाचं असावं, हाच महिलांचा सन्मान आहे. त्यासाठी इतर कुठलंही विधेयक पंतप्रधान निवडू शकले असते. पण, त्यांनी महिला, मुली आणि तरुण तसंच वृद्ध महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा उचलला. हे खूप छान आहे,’ असं कंगना रनौत यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.