वारकरी शिल्पाची समाजकंटकांकडून मोडतोड! ठाकरे सरकारविरोधात संताप

समाजकंटकांनी काठीच्या सहाय्याने वारी शिल्पे तोडून टाकली.

117

सध्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदूंच्या भावनांचा आदरपूर्वक विचार केला जात नाही. सत्ताधारी पक्षात महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाने आधीच सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली आहे, त्यामुळे राज्यात हिंदूंचे सण, उत्सव यांच्यावर कोरोनाच्या नावाखाली दीर्घकाळासाठी बंदी आणण्यात आली. त्यामुळे आधीच ठाकरे सरकारवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप होत असतानाच आता या सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस वाढले आहे. याचा प्रत्यय दहिसर येथे आला.

हिंदूविरोधी मानसिकतेच्या गुंडांचा हैदोस

मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसर येथे हा हिंदू विरोधी प्रकार घडला. या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जवळ एका दुभाजकावर वारकरी बांधवांसाठी श्रद्धास्थानी असलेल्या वारकरी शिल्पाची तोडफोड करण्यात आली. रात्रीच्या वेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या वेळी काही समाजकंटक दुचाकी वाहनाने घटनास्थळी पोहचले. त्यावेळी समाजकंटकांनी काठीच्या सहाय्याने येथील शिल्पे तोडून टाकली. अशा प्रकारे ठाकरे सरकारच्या काळात हिंदूविरोधी मानसिकतेच्या गुंडांचा हैदोस सुरू झाला आहे.

(हेही वाचा : काश्मिरातील जवानांचे रक्त वाळण्याआधीच सूड घ्या!)

भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरून व्हिडिओ प्रसारित

या ठिकाणी बसवण्यात आलेल्या वारकरी शिल्पामध्ये वारकरी बांधव हे खांद्यावर भगवा पतका घेऊन वारीला जात आहेत, असे हे शिल्प आहे. असे हे शिल्प समाजकंटकांनी तोडून टाकले. रस्ता दुभाजकांवर उभारण्यात आलेल्या वारी शिल्पांची तोडफोड करतानाचा व्हिडिओ भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरून प्रसारित केल्यावर खळबळ उडाली. दरम्यान हा व्हिडिओ भाजपाने मुंबई पोलिसांनी ट्वीट केला असता मुंबई पोलिसांनी ‘कृपया आवश्यक कारवाईसाठी अचूक स्थानाचा उल्लेख करा’, असे उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व यंत्रणा हाताशी असताना मुंबई पोलिसांनी मात्र ‘कारवाईसाठी नेमके ठिकाणी कळवा’, असे हास्यास्पद उत्तर दिल्याने आहे. अशा वेळी ठाकरे सरकार संबंधितांवर कठोर कारवाई करणार?, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

तीन जण अटकेत

या विषयावर सोशल मिडीयात जोरदार चर्चा सुरू झाली, तेव्हा याची दखल पोलिसांनी घेतली. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास केला असता तीन जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये विघ्नेश हेगड़े (30), अमर चित्तोरिया (25), संजय गारू (30), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची चौकशी केल्यावर हे आरोपी मद्यपान केलेले होते, त्यांना ते शिल्प शिव्या घालत आहेत, असे वाटल्याने त्यांनी त्या शिल्पाची मोडतोड केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.