दहिसरमध्ये प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांत झालेल्या वादानंतर इमारतीच्या टाकीवरुन ढकले आणि…

वसईतील श्रद्धा वालकर या तरूणीच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरून गेले आहे. यानंतर आता मुंबई पश्चिम उपनगरातील दहिसर भागात देखील प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वयवर्ष २५ असणाऱ्या अमेय दरेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बोरीवली भागात राहण्यास आहे. तर याची प्रेयसी कॉल सेंटरमध्ये काम करण्यास आहे.

(हेही वाचा – वीर सावरकरांबद्दलचं वक्तव्य पडलं महागात; राहुल गांधींविरोधात शिंदे गटाची पोलिसांत तक्रार)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमेय दरेकर आणि जखमी झालेली तरुणी वय वर्ष २४ असणाऱ्या प्रियांगी सिंह हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. रविवारी १३ नोव्हेंबरच्या रात्री प्रियांगी आपल्या प्रियकर अमेय दरेकरला भेटण्यासाठी बोरिवलीच्या घरात निवासस्थानी गेली होती. यावेळी त्यांच्यात काही वाद झाले. यानंतर संतापलेल्या अमेयने प्रियांगीला इमारतीच्या टाकीवरून धक्का मारून ढकलले. यामुळे ती १८ फूट खाली पडल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली.

रविवारी या दोघांची भेट झाली तेव्हा त्यांनी मद्यपान केले होते. यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपी अमेयने प्रियांगीला टाकीवरून ढकलून दिले. यानंतर तिला जबर इजा झाली. घडलेल्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी अमेय आणि त्याच्या आईने प्रियांगीला तिच्या घरी सोडले आणि ते दोघे निघून गेले. हे प्रकरण दहिसर पोलीस ठाणे हद्दीत घडले असल्यामुळे पुढील तपास आता दहिसर पोलिसांकडे सोपवण्यात आल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमेय दरेकरवर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपीला गुरूवारी १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात करण्यात आले होते, त्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here