गुरूवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जाणावलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता सौम्य स्वरूपातील होती. या भूकंपाची खोली जमिनीखाली ७ किमी होती अशी माहिती समोर येत आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप गुजरातमधील सुरतपासून ६१ किमी अंतरावर झाला असून या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
(हेही वाचा – सुषमा अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार? सूचक इशारा देत म्हणाल्या…)
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात देखील गुजरातमधील कच्छ भागात भूकंपाचे हादरे जाणवले होते. त्याची तीव्रता ३.२ इतकी मोजली गेली होती. गांधी नगरच्या सिस्मिक रिसर्च इन्स्टिट्यूटने सांगितले की, हा भूकंप कच्छमध्ये संध्याकाळी ७.४३ च्या सुमारास झाला. या दरम्यानही कोणतीही जिवीत हानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
An earthquake of magnitude 3.5 occurred 61km SE of Surat, Gujarat, India today at around 10.26 am. The depth of the earthquake was 7 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/EM6ExlSadJ
— ANI (@ANI) October 20, 2022
याआधी नेपाळच्या शेजारच्या देशात बुधवारी ५.९ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे धक्के बिहारच्या अनेक भागात जाणवले. मुझफ्फरपूर, सीतामढीसह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप दुपारी ३.४५ वाजता झाला, त्याचा केंद्रबिंदू काठमांडूपासून ५३ किमी पूर्वेला आणि १० किमी खोलीवर होता.
Join Our WhatsApp Community