सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाके येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शाहिद मुल्ला असे मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हा विद्यार्थी मुळशी तालुक्यातील प्रियदर्शिनी स्कूलमध्ये शिकत हाेता. या शाळेतील ६० विद्यार्थी आणि शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते. दुपारी बाराच्या सुमारास सिंहगडावरील देवटाके आणि हत्तीटाके परिसरात विद्यार्थी आले होते. हा परिसर पावसामुळे निसरडा झाल्याने या विद्यार्थ्याचा पाय घसरला. शेवाळावरून शाहिदचा पाय घसरला आणि तो टाकीत पडला.

( हेही वाचा: याच वाघाने डरकाळी फोडल्यावर महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी पहिलं; केसरकरांचा ठाकरेंना टोला )

उपचारापूर्वीच विद्यार्थ्याचा मृत्यू 

या घटनेची माहिती शिक्षकांनी त्वरित सिंहगडावरील व्यावसायिकांना दिली. त्यानंतर अमोल पढेर, विठ्ठल पढेर, आकाश बांदल, विकास जोरकर, तुषार डिंबळे, पवन जोरकर, सूरज शिवतारे यांनी पाण्यात शोधमाेहीम राबवली. शाहिदला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here