दुबईत राहणारा भारतीय ड्रायव्हर एका रात्रीत झाला करोडपती! कसा झाला हा चमत्कार?

143

सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करणारा भारतीय कार्यक्रम म्हणजे “कौन बनेगा करोडपती”. एका रात्रीत श्रीमंत होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग. लॉटरी हा एक पारंपरिक प्रकार आहे श्रीमंत होण्याचा. पण असे नशीब फार कमी जणांचे चमकते. समजा तुम्ही तुमच्या मायदेशापासून दूर राहताय आणि तुम्हाला दुसर्‍या देशात कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली तर? यूएईमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या एका ड्रायव्हरचं नशीब चमकलंय.

३३ कोटी रुपये मिळाले

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार दुबईमध्ये राहणारा ३१ वर्षीय अजय ओगुला हा तरुण एका रात्रीत कोट्यधीश झाला. अमीरात ड्रॉ मध्ये त्याला ३३ कोटी रुपये मिळाले. अजय म्हणतो की, त्याचा अजूनही विश्वास बसत नाही की तो एवढी मोठी रक्कम जिंकला आहे. त्याने जेव्हा आपल्या गावी फोन करुन ही बातमी सांगितली तेव्हा त्यांच्या कानावर त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

(हेही वाचा अजित पवार राष्ट्रवादी सोडणार; दीपक केसरकरांचा दावा)

आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीचे तिकीट घेतले होते

अजय ओगुला हा चार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातून संयुक्त अरब अमिरात येथे नोकरीसाठी आला होता. सध्या तो ज्वेलरीच्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याला त्यासाठी ३२०० दरमहा म्हणजे साधारण ७२,००० पगार मिळत होता. आता त्याला नोकरी करायची गरज राहिली नाही. उलट तोच अनेकांना नोकरी देऊ शकेल. आधी अजयला वाटलं की लॉटरी लागली ठीक आहे! परंतु पैसे जास्त मिळणार नाही, कमी रकमेची लॉटरी लागली असेल. पण जेव्हा त्याला खरी रक्कम कळली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. अजयने आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीचं तिकीट घेतलं होतं आणि पहिल्या पाळीतच त्याला लॉटरी लागली. एक – दोन कोटी नव्हे तर तब्बल ३३ कोटी! या पैशांतून अजय एक चॅरिटी ट्रस्ट स्थापन करणार आहेत, जेणेकरुन त्यांचे आणि त्यांच्या शेजारील गावाच्या काही मूलभूत गरजा भागवू शकतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.