महिन्याभरात दुसऱ्यांदा सज्जनगडाच्या पायथ्याशी सापडला बिबट्याचा बछडा पण…

103

सातारा येथील सज्जनगडाच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत वनाधिका-यांना सापडला. दोन आठवड्यांच्या आत ही दुसरी घटना आहे. शनिवारी सज्जनगढाच्या पायथ्याशी दिसून आलेल्या बिबट्याच्या शेपटीला जखम झाली होती. २० सप्टेंबर रोजी आढळलेला बिबट्याचा बछडा आणि शनिवारी आढळेला बिबट्याचा बछडा हे दोघेही एकमेकांचे सख्खे भाऊ असावेत, असा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी सोडली ठाकरेंची साथ अन् केला शिंदे गटात प्रवेश!)

शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास सातारा प्रादेशिक वनविभागाच्या स्थानिक टेहाळणी पथकाला जखमी बिबट्याच्या बघड्याची माहिती मिळाली. आम्ही टेहाळणीवरच असल्याने दहा मिनिटांतच घटनास्थळी पोहोचलो, अशी माहिती सातारा प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण यांनी दिली. बिबट्याचा बछडा जागेवरच निपचित पडून होता. शेपटीच्या जखमेत मॅगेट्स किडे झाले होते. बछड्यांच्या डोळ्यात बरीच घाण साचल्याने त्याला डोळेही व्यवस्थित उघडता येत नव्हते.

वनाधिका-यांनी तातडीने बिबट्याच्या बछड्याला शिरवळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेले. अंदाजे पावणेदोन महिन्यांचा बछडा अशक्त होता. बछड्याच्या शेपटीला कोणीतरी चावले असावे किंवा बसताना बछड्याला खरचटल्याची शक्यता वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण यांनी व्यक्त केली. बछड्याच्या शारिरीक तपासणीदरम्यान त्याने तीन-चार दिवस काहीच खाल्ले नसल्याचे वनाधिका-यांना समजले. बछड्याला उपचारासाठी पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे पाठवण्यात आल्याचेही डॉ चव्हाण यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.