परमबीर सिंग यांच्या विरुद्ध दुसरी ओपन इन्क्वायरी

या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आणखी एका प्रकरणात परमबीर सिंग यांची ओपन इन्क्वायरी करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी मिळाली आहे. लवकरच ही चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांना मुंबई पोलिस आयुक्त असतांना परमबीर सिंग यांनी निलंबित केले होते. निलंबन मागे घेऊन पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी मध्यस्थीच्या मार्फत सिंग यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप डांगे यांनी केला होता.  या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती.

सिंग यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या प्रकरणात देखील ओपन इन्कवारी करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. राज्य सरकारने परमबीर सिंग यांच्या विरोधात ओपन इन्कवारी करण्यासाठी परवानगी दिली आहे. पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरुद्ध मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून तक्रार केली होती.परमबीर सिंग यांच्यावर गुन्हे
घाडगे यांच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग यांच्या विरुद्ध सर्वात प्रथम गुन्हेगारी षडयंत्र  रचणे, पुरावे नष्ट करणे, जातीवाचक शब्द वापरने (अट्रोसिटी कायदा) अंतर्गत गुन्हा ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ओपन इन्कवारी करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. लवकरच या प्रकरणाची ओपन इन्कवारी करून गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागा आहे.

(हेही वाचा : पडळकरांचा आता ‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ नारा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here