प्रत्येक १० मिनिटाला पुण्यासाठी साेलापुरातून सुटतेय एक एसटी

118

उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सीझनमुळे प्रवाशांची गर्दी माेठी आहे. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या तर अधिक आहे. शिवाय हुतात्मा एक्स्प्रेस बंद आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने नियोजन केले असून प्रत्येक १० मिनिटाला सोलापुरातून पुण्यासाठी एक गाडी सुटत आहे. एसटी सेवा पूर्वपदावर आली असून प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे, विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे नियोजन

सध्या सोलापूर विभागातून पुण्याला जाण्यासाठी ७० एसटी धावतात. शिवाय हैदराबाद, उमरगा, कर्नाटक यातून सोलापूरमार्गे ४० हून पुण्याकडे जातात. याशिवाय आणखी ४० एसटीची पुण्याला जाण्यासाठी सोय केली आहे. त्यामुळे सोलापूरहून पुण्याकडे जाण्यासाठी दिवसभरात १५० एसटीची व्यवस्था आहे. उन्हाळ्याची सुट्टी व तांत्रिक कामामुळे रेल्वेच्या काही गाड्या बंद आहेत. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नियोजन केले आहे. त्यामुळे सोलापूर येथील प्रवाशांची पुण्याला जाताना तारांबळ होणार नाही. दररोज पहाटे पाचपासून रात्री १२ वाजेपर्यंत सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. पुणे फलाटावरून प्रत्येक दहा मिनिटानंतर गाडी सुटण्याचे नियोजन केले आहे.

( हेही वाचा: केतकी चितळेच्या पोस्टवर काय म्हणाले शरद पवार?  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.