Anand Mahindra Job Offer : उद्योजक आनंद महिंद्रा यांनी १३ वर्षीय मुलीला दिली थेट नोकरीची ऑफऱ

उत्तर प्रदेशमधील १३ वर्षीय मुलीच्या शौर्याने आनंद महिंद्रा प्रभावित झाले आहेत.

227
Anand Mahindra Job Offer : उद्योजक आनंद महिंद्रा यांनी १३ वर्षीय मुलीला दिली थेट नोकरीची ऑफऱ
Anand Mahindra Job Offer : उद्योजक आनंद महिंद्रा यांनी १३ वर्षीय मुलीला दिली थेट नोकरीची ऑफऱ
  • ऋजुता लुकतुके

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) त्यांच्या ट्विट्सवरून नेहमीच चर्चेत असतात. ते समाजमाध्यमावर वेगवेगळ्या विषयावर आपले मत खुलेपणाने व्यक्त करतात. भारतातील अनेक लोक त्यांच्याकडे थेट वेगवेगळ्या मागण्या करताना दिसतात. विशेष म्हणजे तेही यातील काही लोकांच्या मागण्या खुल्या मनाने मान्य करतात. सध्या मात्र आनंद महिंद्र (Anand Mahindra) यांनी एका १३ वर्षीय मुलीला स्वत:हून थेट नोकरीची ऑफर दिली आहे. (Anand Mahindra Job Offer)

यापूर्वी आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत. त्यांच्याकडे याआधी कोणी कार मागितलेली आहे तर कोणी त्यांच्याकडे नोकरी देण्याची विनंती केलेली आहे. यावेळी मात्र खुद्द महिंद्र यांनी निकिताला नोकरीची ऑफर दिली आहे. ही मुलगी मुळची उत्तर प्रदेशातील बस्ती या शहातील रहिवासी आहे. तिने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत स्वत:चे तसेच तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचवले होते. अलेक्झा या व्हॉइस असिस्टंटची मदत घेऊन हल्ला करणाऱ्या माकडांना हुसकावून लावले होते. त्या मुलीच्या याच कामगिरीची दखल घेत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी तिला नोकरीची ऑफर दिली आहे. (Anand Mahindra Job Offer)

(हेही वाचा – डॉ. आंबेडकर जयंतीदिनी ‘ड्राय डे’ रद्द करण्यात Bombay High Court चा नकार)

(हेही वाचा – Sharad Pawar यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल का केले?)

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुलीला नोकरीची ऑफर देताना एक्स या समाजमाध्यमावर एक ट्वीट केलं आहे. आपल्या या ट्वीटमध्ये महिंद्र यांनी माकडांना हुसकावून लावणाऱ्या 13 वर्षीय मुलीचे तोंडभरून कौतूक केले आहे. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होणार की या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणार हा आजच्या जगातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी कल्पकता अधिक सक्षम होऊ शकते, हेच या मुलीच्या उदाहरणातून स्पष्ट होते. तिने केलेला हा विचार कौतुकास्पद आहे. यातून तिची नेतृत्वशैलीच समोर आली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर या मुलीला जर कॉर्पोरेट जगात नोकरी करायची इच्छा असेल तर आम्ही मदत करू. मी अपेक्षा करतो ही मुलगी शिक्षण झाल्यावर आमच्यासोबत काम करण्यास उत्सूक असेल, असे मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. (Anand Mahindra Job Offer)

दरम्यान, या मुलीने अलेक्झाला दिलेल्या आदेशाचा आणि त्यानंतर माकडांनी पळ काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. अनेकांनी या मुलीच्या शौर्याची दखल घेत तिचे कौतुक केले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.