भारताच्या नादी कधीही लागू नका; आनंद महिंद्रा यांनी सुनावलं, पण का?

111

शाॅर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. शाॅर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने एका अहवालात स्टाॅक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अहवाल समोर आल्यापासून अदानी ग्रुपवर जागतिक माध्यामांमध्ये अनेक अंगांनी चर्चा केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या मदतीला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे अप्रत्यक्षरित्या धावून आले आहेत. सोशल मीडियात कमालीचे सक्रीय असेलेले आनंद महिंद्रा नेहमीच यशस्वी गाथा, प्रेरणा देतील अशा स्टोरीज शेअर करत असतात. मात्र, आता त्यांनी अप्रत्यक्ष अदानी समूहाच्या मदतीला धावू जाताना जागतिक माध्यमांना चांगलेच सुनावले आहे.

आनंद महिंद्रा यांचे ट्वीट काय?

आनंद महिंद्रा ट्वीटमध्ये म्हणतात, उद्योग क्षेत्रातील सध्याची आव्हाने जागतिक आर्थिक महाशक्ती बनवण्याच्या भारताच्या महत्त्वकांक्षेला खीळ घालतील की नाही, यावर जागतिक मीडिया अंदाज लावत आहेत. भूकंप, दुष्काळ, मंदी, युद्धे, दहशतवादी हल्ल्यांना भारत तोंड देत असताना, मी दीर्घकाळ पाहत आलो आहे. मी एवढेच सांगेन, भारताच्या नादी कधीही लागू नका.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.