Anand Shankar Dhruva : भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक आनंदशंकर ध्रुव

आनंदशंकर ध्रुव यांनी हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानावर अनेक निबंध लिहिले. या निबंधांचा आजही अभ्यासात उपयोग केला जातो. शैक्षणिक क्षेत्रासह त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोठे काम करु ठेवले आहे.

230
Anand Shankar Dhruva : भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक आनंदशंकर ध्रुव
मुमुक्षु आणि हिंद-हितचिंतक या टोपण नावाने लिहिणारे आनंदशंकर ध्रुव (Anand Shankar Dhruva) हे भारतातील थोर व्यक्तिमत्वांपैकी एक होते. आनंदशंकर बापूभाई ध्रुव हे बॉम्बे प्रेसिडेन्सी येथील विद्वान, लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि संपादक होते. आदराने लोक त्यांना ‘आचार्य’ म्हणत. त्यांनी गुजराती साहित्य परिषद आणि फिलॉसॉफिकल काँग्रेस यासह अनेक साहित्यिक आणि भाषिक संघटनांचे नेतृत्व केले होते. (Anand Shankar Dhruva)
आचार्य आनंदशंकर ध्रुव (Anand Shankar Dhruva) यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८६९ रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांचे वडील काठियावाड एजन्सीचे अधिकारी होते आणि तिथून निवृत्ती घेतल्यानंतर ते बडोदा राज्याचे एजंट म्हणून काम करु लागले. आचार्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकले. लहानपणीच त्यांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवले. त्याचबरोबर मास्टर ऑफ आर्ट्सचे शिक्षण घेत असताना त्यांनी १८९३ मध्ये गुजरात कॉलेजमध्ये संस्कृत शिकवायला सुरुवात केली. (Anand Shankar Dhruva)
१९२० मध्ये त्यांची बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते द मॉडर्न स्कूलचे आंतरविद्यापीठ मंडळाचे अध्यक्षही होते. ध्रुव (Anand Shankar Dhruva) यांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृत साहित्य तसेच पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि संस्कृतीवर आधारित अनेक पुस्तकांचे लेखन केले. पुढे त्यांनी हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानावर अनेक निबंध लिहिले. या निबंधांचा आजही अभ्यासात उपयोग केला जातो. शैक्षणिक क्षेत्रासह त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोठे काम करु ठेवले आहे. ७ एप्रिल १९४२ रोजी त्यांचे निधन झाले. (Anand Shankar Dhruva)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.