जगातील सर्व समस्यांचे उत्तर सनातन धर्मात आहे. अनेक जण इतरांना वेगवेगळ्या गोष्टी दान करत असतात. त्याऐवजी सर्वांना सनातन धर्माची (Sanatan Dharma) सकारात्मक रहाण्याची शिकवण सांगावी. कोणत्याही प्रकारचे संकट आले, अडचणी आल्या, तरी आपण सकारात्मक रहावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी यांना सामोरे जाता येते, असे प्रतिपादन आनंदा मॅथ्यू (Ananda Matthew) यांनी केले.
(हेही वाचा – Mumbai Terrorist Attack: २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मृत्यूच्या दारात, पाकिस्तानच्या तुरुंगात विषबाधा)
अमेरिकी सिनेमॅटोग्राफर असूनही आध्यात्मिक लिखाण
४ डिसेंबर या दिवशी आनंदा मॅथ्यू (Ananda Matthew) यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) भेट दिली. या वेळी आनंदा मॅथ्यू यांनी स्वत:च्या साधनाप्रवासावर आधारलेले ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ (In Quest of Guru) हे पुस्तक ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांना भेट दिले.
या प्रसंगी मूळ अमेरिकी सिनेमॅटोग्राफर असूनही हे आध्यात्मिक (Spirituality) लिखाण करणारे आनंदा मॅथ्यू यांची स्वप्नील सावरकर यांनी मुलाखत घेतली. हिंदुस्थान पोस्टच्या कार्यालयात दिलेल्या भेटीवेळी मॅथ्यू यांनी संपादकीय विभागातील सर्वांशी संवाद साधला. या मुलाखतीच्या वेळी आनंदा मॅथ्यू यांनी जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन (Positive Thoughts) दिला. अमेरिकी वंशाच्या आणि मूळ कॅथोलिक असलेल्या व्यक्तीकडून हिंदु धार्मिक उपासनेविषयी ऐकणे हा वेगळा अनुभव होता.
(हेही वाचा – J&K Reorganisation Bill 2023 : गृहमंत्री अमित शाह लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक-2023 सादर करणार)
‘आनंदी जीवन जगण्याच्या ५ सोप्या टीप्स’
आनंदा मॅथ्यू यांनी आनंदी जीवन जगण्याच्या ५ सोप्या टीप्स या मुलाखतीत सांगितल्या.
१. सकाळी उठल्यावर प्रथम ईश्वरा, भगवंता, देवा अशा कोणत्याही सकारात्मक शब्दाचा उच्चार करावा.
२. देवाने आपल्याला जीवनात हा आणखी एक दिवस दिला, यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी.
३. देवा ‘मला हे दे’, ‘ते मिळू दे’ असे काही मागू नये. त्यापेक्षा माझ्यासाठी जे आवश्यक आहे, ते तू घडव, अशी प्रार्थना करावी.
४. काही वेळा आपण जशी कल्पना करतो, त्यापेक्षा वेगळे घडते. अशा वेळी कठीण प्रसंगांकडे सकारात्मक दृष्टीने पहावे.
५. इतरांनाही मदत करतांना त्यांना सकारात्मक दृष्टी द्यावी.
‘मॅथ्यू शाॅकी’ ते ‘आनंदा मॅथ्यू’ पर्यंतचा प्रवास
- मूळ अमेरिकेतील असलेले मॅथ्यू शाॅकी यांनी कर्नल अशोक किणी यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक तत्त्वांचे अनुसरण करण्यास सुरुवात केली.
- कर्नल अशोक किणी यांनी त्यांना जीवनातील समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचा दृष्टीकोन दिला.
- आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत, तशाच प्रकारच्या समस्या इतरांच्याही आयुष्यात आहेत, हे लक्षात आल्याने मॅथ्यू शाॅकी यांनी इतरांनाही सकारात्मक रहाण्यासाठी प्रोत्साहित करायला सुरुवात केली.
- सनातन धर्मात ज्या पद्धतीने जीवनाकडे पाहिले जाते, तो विचार अन्य धर्मात नसल्यामुळे मॅथ्यू शाॅकी यांनी सनातन हिंदु धर्माची (Sanatan Dharma) शिकवण अनुसरण्यास सुरुवात केली. आणि ते आनंदा मॅथ्यू (Ananda Matthew) झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community