अनंतराय मणिशंकर रावल हे गुजराती समीक्षक आणि संपादक होते. (Anantarai Mani Shankar Rawal) त्यांचा जन्म १ जानेवारी १९१२ साली गुजरातमधील अमरेली येथे झाला. त्यांनी सरकारमध्ये भाषा विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे तसेच त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये अध्यापन केले. त्यांनी प्रामुख्याने शौनक या टोपणनावाने टीका लिहिली आणि गुजराती साहित्य आणि साहित्यिकांच्या अनेक ग्रंथांचे संपादन केले.
त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमरेली येथून पूर्ण केले. १९२८ मध्ये त्यांनी मॅट्रिक पास केले. पुढे भावनगरच्या समलदास महाविद्यालयातून त्यांनी गुजराती आणि संस्कृतमध्ये कला शाखेची पदवी प्राप्त केली आणि दोन वर्षे ते त्याच महाविद्यालयाचे फेलो म्हणून काम करत होते. १९३४ मध्ये त्यांनी गुजराती आणि इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केले. विशेष म्हणजे ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे मुंबई विद्यापीठातील पहिले विद्यार्थी होते.
(हेही वाचा – Bmc conservancy workers : सफाई कामगारांच्या पाल्यांच्या विदेशी शिक्षणाचा खर्च महापालिका उचलणार: मुख्यमंत्र्यांची घोषणा )
त्यांनी हिंदुस्थान प्रजामित्र दैनिकात तीन महिने उपसंपादक म्हणून काम केले. रावल यांनी ऑगस्ट १९३४ मध्ये अहमदाबाद येथील गुजरात कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि जामनगरच्या डी.के.व्ही. कॉलेजचे प्राचार्य म्हणून दीड वर्षे काम केले. साहित्यविहार हा त्यांचा पहिला टीका संग्रह होता. गंधाक्षत, साहित्यविवेक, साहित्यनिकश, समीक्षा, समलोचना, उन्मिलन ही त्यांची इतर टीका ग्रंथे आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादनही केले आहे.
त्यांनी गुजरात सरकारच्या भाषा विभागाचे संचालक म्हणून काम केले. नंतर त्यांची गुजरात विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचरमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९७७ मध्ये ते अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले. त्यांनी गुजरात सरकारच्या कायदा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. १९७९ मध्ये वडोदरा येथे गुजराती साहित्य परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष स्थानावर विराजमान होते. १८ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांचे निधन झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community