Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत 4 जवान शहीद

121
Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत 4 जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या (Anantnag Encounter) सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच राहतात. अशातच जवळपास दोन दिवसांपासून अनंतनाग येथे सुरु असणारं एनकाऊंटर तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे.

अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनंतनागमध्ये (Anantnag Encounter) आणखी एक जवान शहीद झाला आहे. अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे. येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

(हेही वाचा – Medical Students Problem : वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी देह मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण, देहदान चळवळीला गती नाही)

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात (Anantnag Encounter) सर्च ऑपरेशन सुरू आहे. घनदाट जंगलात ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. या चकमकीत आतापर्यंत 5 जवान जखमी झाले आहेत. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे, तर शहीद जवानांची संख्या आता 4 वर पोहचली आहे.

जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता

चार अधिकारी शहीद झालेल्या काश्मीरच्या जंगलात दहशतवाद्यांचा (Anantnag Encounter) शोध सुरू आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. या जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. हे दहशतवादी द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच टीआरएफशी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव उझैर खान असल्याचे सांगण्यात येत आहे. उझैर खानचा लष्कर प्रमुख हाफिज सईदशी थेट संबंध आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.