इस्त्रोच्या ‘छोट्या राॅकेट’चे दुसरे यशस्वी उड्डाण, EOS 07 सह तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

134

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोकडून SSLV D2 राॅकेट (Small Sataellite Launch Vehicle) लाॅंच करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा इथून या उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले आहे. या राॅकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट, अमेरिकन कंपनी अॅंटरीसचा जानस 1 आणि देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या आझादीसॅट 2 लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले आहे.

इस्त्रोचे सर्वात छोटे राॅकेट SSLV D2

इस्त्रोकडून शुक्रवारी लघु उपग्रह प्रक्षेपक म्हणजेच सर्वात छोटे राॅकेट SSLV D2 चे दुसरे प्रायोगिक उड्डाण यशस्वीरित्या पार पडले आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटी येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह प्रक्षेपण पार पडले आहे. विशेष म्हणजे SSLV राॅकेटचे पहिले प्रक्षेपण अपयशी ठरले होते. त्यानंतर आता या राॅकेटचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. लहान उपग्रहांना कमी वेळेत आणि कमी खर्चात अवकाशात पाठवता यावे, यासाठी इस्त्रोतर्फे एसएसएलव्गी या नव्या राॅकेटची निर्मीती करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.