सत्तारुढ असताना आपल्या हातात असणा-या पावरचा कसा चुकीचा वापर केला जातो त्याच एक उदाहरण देणारा प्रसंग नुकताच समोर आला आहे.आंध्र प्रदेशचे आमदार बी करुणाकर रेड्डी यांच्या मुलाने एका अधिका-याने विमान तळावर प्रवेश नाकारल्यानंतर त्या विमानतळाचा पाणी पुरवठाच खंडित केला आहे.
पाणीपुरवठा केला खंडित
करुणाकर रेड्डी हे सत्ताधारी युवजन श्रमिका रायथू काॅंग्रेस पक्षाचे (YSRCP) नेते आहेत. तिरुपतीचे रेनिगुंटा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. करुणाकर रेड्डींचा मुलगा अभिनय रेड्डी या आठवड्याच्या सुरुवातीला आंध्र प्रदेशचे मंत्री बोत्सा सत्यनारायण यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेला होता. यादरम्यान, त्याची तेथील अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची झाली. या विमानतळाचे व्यवस्थापक सुनिल यांनी अभिनय रेड्डी यांना प्रवेश नाकारला. यावरुन त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. अभिनय रेड्डी याने बदल्याची भूमिका घेत रेनिगुंटा विमानतळ आणि कर्मचा-यांच्या निवासस्थानांचा पाणीपुरवठा खंडित केला.
( हेही वाचा: स्टेअरिंग हाती घेत, ‘त्या’ रणरागिनीने असे वाचवले प्रवाशांचे प्राण! )
अधिकारीच चुकीचे
महापालिकेने मात्र पाइपलाइनमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा दावा केला आहे. ड्रेनेजचे पाणी तेलुगू गंगेचे पाणी दूषित करत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. रेनिगुंटा विमानतळाचे अधिकारी चुकीचे वागले आणि अधिकृत प्रोटोकॉलचे पालन केले नाही, असा आरोप वायएसआरपीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत मात्र विरोधी पक्षाचे नेते नारा लोकेश यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत, अभिनय रेड्डी यांच्यावर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community