आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडूंच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 8 जणांचा मृत्यू

226

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरु येथे चंद्रबाबू नायडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर काढलेल्या ‘रोड शो’दरम्यान ही घटना घडली.

नेमके काय घडले?

बुधवारी संध्याकाळी नायडू यांनी आपल्या वाहनातून रोड शो करायला सुरुवात केली. यावेळी हजारो लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. नायडू यांचा रोड शो सुरु असताना, लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. अनेक लोक पाण्याच्या कॅनाॅलमध्ये पडले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा: शरद पवारांचा ‘हा’ गुण त्यांचे शिष्य उद्धव ठाकरे का घेत नाहीत? )

या घटनेनंतर चंद्रकांतबाबू नायडू यांनी रोड शो तत्काळ थांबवला. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.