2019 मध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले होते. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोना व्हायरसवर औषध नसल्याने जगभरातील लाखो लोकांना प्राणांना मुकावे लागले. त्यातच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस विकसित करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवस रात्र एक करु लागले. अखेरीस त्यावर उपाय सापडला. रशियात स्पुतनिक V ही जगातील पहिली कोरोनाची लस बनवण्यात आली. परंतु आता ही लस तयार केलेल्या वैज्ञानिकाची हत्या झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
आंद्रे बोटीकोव्ह असे या मृत वैज्ञानिकाचे नाव आहे. आंद्रे बोटीकोव्ह हे एक रशियन वैज्ञानिक आहेत. स्पुतनिक V ही जगातील पहिली कोरोनाची लस बनवणा-या रशियन वैज्ञानिकांच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता. राहत्या घरीच आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. परिचयाच्याच व्यक्तीने आंद्रे बोटीकोव्ह यांची हत्या केली आहे. याप्रकरणी 29 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा: ‘रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले, शिमग्याच्या बोंबा पुरे आता’; भाजपकडून उद्धव ठाकरेंचा समाचार )
हत्येनंतर काही तासांतच आरोपी अटकेत
रशियाची राजधानी असलेल्या माॅस्कोमधील अपार्टमेंटमध्ये आंद्रे बोटीकोव्ह राहत होते. राहत्या अपार्टमेंटमध्येच आंद्रे बोटीकोव्ह यांचा मृतदेह आढळून आला होता. आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर काही तासांतच पोलिसांना एका संशयिताला अटक केली. पोलीस तपासात आरोपी दोषी आढळला.
याप्रकरणी माॅस्को पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. आंद्रे बोटीकोव्ह हत्याप्रकरणी 29 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याने हत्येची कबुली दिली असल्याची माहिती या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. अटक संशयित आरोपीवर यापूर्वीसुद्धा हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.