भराडी देवीच्या जत्रेक जातास, मगे ही बातमी वाचा…

220

कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आंगणेवाडीची यात्रा. कोकणातील प्रसिद्ध तसेच कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणा-या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री. भराडी मातेचा वार्षिकोत्सव गुरुवारी 24 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे.  कोरोना  नियमांचे काटेकोर पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण 

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात येत असल्याने, यंदाच्या यात्रेला परवनागी देण्यात आली आहे. यात्रेची तारीख जाहीर झाल्याने, भविकांनी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आणि पर्यटकांनी रेल्वेचे बुकींग सुरू केले आहे. महाराष्ट्रातून हजारो भाविक आंगणेवाडीच्या यात्रेला जात असतात.

( हेही वाचा: राऊतांचा बोलविता धनी उद्धव ठाकरे, सोमय्यांचा हल्लाबोल! )

( हेही वाचा: तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव )

दोन्ही डोस बंधनकारक

या यात्रेच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंगणे कुटुंबीयांसोबत कुडाळ येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हा उत्सव मर्यादित स्वरूपात होणार असून, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही पूर्ण लसीकरण बंधनकारक असणार आहे. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करूनच ही यात्रा होणार आहे.

‘अशी’ केली जाते तारीख निश्चित

विविध क्षेत्रातील अनेक मोठी व्यक्ती तसेच देश विदेशातील लोक या जत्रेला उपस्थित राहतात. रविवारी सकाळी देवीचा कौल घेऊन अनेकदा यात्रेची तारीख ठरवली जाते. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.