दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या जत्रौत्सवाची तारीख जाहीर झाली आहे. कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव शनिवार 4 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
(हेही वाचा – BEST योजना! फक्त ५० रूपयांत करा ‘मुंबई’ शहराची सफर!)
महाराष्ट्रातच नव्हे तर देश-परदेशातही या कोकणातील आंगणेवाडीच्या जत्रेचे आकर्षण असते. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. अवघ्या दीड दिवसाच्या या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. सामान्य भाविकांपासून ते राजकारणातील नेते मंडळी, कलाकार देखील या यात्रेत सहभागी होतात. यंदा साधारण 10 लाखांच्या आसपास भाविक यात्रेला सहभागी होतील, असा अंदाज मंदिराच्या कार्यकारणीकडून वर्तविला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा लौकिक असलेल्या या जत्रोत्सवाला लाखो भाविकांसह सिंधुदुर्गासह राज्यातील इतर भाविक दाखल होत असल्याने भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या एसटी बसेस आणि रेल्वेकडून देखील विशेष गाड्यांचे नियोजन केले जाते.
Join Our WhatsApp Community