अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ‘या’ प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन!

154

किमान वेतन आणि पेन्शन आदी मागण्यांसाठी राज्य शासनाने आता होणाऱ्या अधिवेशनात तरतूद करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने ७ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी दिली.

( हेही वाचा : मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त बनले जनसेवक! उचलले ‘हे’ पाऊल… )

सकारात्मक चर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, पेन्शन मिळावी, अंगणवाडी साहित्य लाभार्थ्यांना मिळावे, रजिस्टरसाठी निधी द्यावा, आदिवासी भागात जादा मानधन द्यावे, मिनी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळावी, १५ मार्चपासून अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने २३ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी संघटना प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली.

धरणे आंदोलन करणार

या चर्चेदरम्यान अंगणवाडी साहित्य, रजिस्टरसाठी निधी, आदिवासी भागात जादा मानधन द्यावे, मिनी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळावी, १५ मार्च पासून अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे आदी विविध मागण्या मान्य करण्यात आल्याने हे धरणे आंदोलन रद्द करण्यात आले. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईलसाठी १० हजार रुपये मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे तसेच पगाराच्या निम्मी रक्कम सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात मिळावी या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत आणि यासाठी राज्यशासनाने आता होणाऱ्या अधिवेशनात निधीची तरतूद करावी. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने ७ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले येणार असल्याची माहिती संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.