कांदा कोणाला हसवणार अन् कोणाला रडवणार?

151

गेल्या 10 दिवसांपूर्वी 3 हजार रुपये प्रति क्विंटल जाणारा कांदा आता 1200 रुपये प्रति क्विंटल जात आहे. अचानकपणे कांद्याचे दर गडगडल्याने उन्हाळी कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.

दोन दिवसांत दर कोसळले

सोलापूर येथील मोडनिंब व परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, पडसाळी, भेंड या भागांत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. यंदाच्या वर्षी सुरुवातीला कांद्याचे दर तब्बल दोन महिन्यांपासून सोलापूर व मोडनिंब बाजारपेठेमध्ये तेजीत होते. अडीच हजाराच्या पुढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गेल्या दोन दिवसांत अचानकपणे दर कोसळले आहे.

(हेही वाचा –बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर 200 हून अधिक लोकांच्या जमावाकडून हल्ला)

शेतकरी वर्गामध्ये निराशेचे वातावरण

यंदाच्या वर्षी अतिशय चांगल्या प्रतीचा कांदा पीक शेतकऱ्यांनी आणले होते पण अधून-मधून पडणारा पाऊस व धुके यामुळे काढणीस आलेला कांदा पावसामुळे सडत होता. शिवाय कांद्यावर करपा रोग पडत होता. वेळोवेळी औषध फवारणी करुन कसेबसे शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा आणला. कांदा रानात असेपर्यंत चांगले दर मिळेल असे वाटत होते. मात्र, बाजारात दाखल झाल्यावर अचानकपणे दर कमी झाल्याने शेतकरी वर्गामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.