भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायी दाखल होत आहे. मात्र काही वेळापूर्वी तेथे येणाऱ्या अनुयायांना प्रवेश नाकारण्यात आला, त्यामुळे त्यांच्यात संतापाची लाट उसळली. आज होत असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, असं अनुयायांकडून सांगण्यात आले. यावेळी आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये देखील वाद झाला होता.
(हेही वाचा – डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई लोकलकडून विशेष सेवा)
चैत्यभूमीवरील परिस्थिती नियंत्रणात
चैत्यभूमीवर प्रवेश दिला नाही म्हणून अनुयांचा संताप झाला. यावेळी भीम अनुयायांनी चैत्यभूमी शिरण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांना अडवलं असता त्यांच्यात वाद झाला. मात्र सध्या चैत्यभूमीवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. गोंधळ घालणाऱ्या अनुयायांच्या गटाला पोलिसांनी बाहेर नेले असून बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी अद्याप मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे. यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर केली आहे.
…म्हणून झाला अनुयायांमध्ये संताप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचं आवाहन पालिकेकडून अनुयायांना करण्यात आले होते. मात्र असे असले तरी पालिकेकडून अनुयायांना कोणात्याही पायाभूत सुविधा पुरविल्या नसल्याने त्यांच्यात संताप होता.
- शिवाजी पार्क उद्यानात टेन्ट्स उभारण्यात आलेले नव्हते
- आंबेडकरांचे साहित्य किंवा त्यांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यास परवानगी नाही
- महापलिकेने अनुयायांना अभिवादन करण्यास यायला सांगितले पण कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या नाहीत
महापौर म्हणतात, ‘सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार’
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, चैत्यभूमी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या परिपत्रकाला शिवसेनेच्या महापौरांनी केराची टोपली दाखली. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महिपरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर सर्वांना येता येणार असून अभिवादन करता येणार आहे. मात्र यावेळी त्यांना पालिकेकडून आणि पालिकेत शिवसेनेच्या असलेल्या महापौरांकडून सुविधा पुरविण्यात आल्या नाही असे काही अनुयायांनी म्हटले आहे. तसेच, पंढरपूरात वारी चालते, राजकारण्यांच्या राजकीय सभा चालतात, साहित्य संमेलन चालते आणि फक्त महिपरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी आलेलं चालत नाही, तेव्हा प्रशासनाला कोरोना दिसतो.. असा सवाल देखील संतप्त अनुयायांने उपस्थितीत केला आहे.
काय म्हणाल्या महापौर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महिपरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. मात्र, या दरम्यान कोविड प्रोटोकॉलचे पालन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यासह कोरोना महामारीच्या आजाराचा धोका लक्षात मुंबई आणि जवळपासच्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहनही महापौरांनी केले. मुंबई आणि जवळपास नागरिकांना चैत्यभूमीवर कधीही येता येईल. मात्र, बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे महापौरांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community