परिवहन मंत्री अनिल परब हे सलग दुसऱ्या दिवशी ईडीच्या चौकशीला सामोरे गेले, ईडीने सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणात नोंदवलेल्या मनी लौण्डरिंगच्या गुन्हयात सलग सात तासांपासून चौकशी सुरू आहे.
कॅबिनेटची मिटिंग आटोपून ईडीच्या चौकशीला हजर
दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या मनी लौण्डरिंगच्या गुन्हयात अनिल परब यांच्याकडे ईडीकडून चौकशी सुरू आहे. सोमवारी ईडीने बजावलेल्या समन्सनंतर मंगळवारी, २१ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते, ईडीने तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर परब यांना रात्री साडे दहा वाजता सोडण्यात आले होते, मात्र बुधवारी, २२ जून रोजी त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात चौकशीकरता हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. बुधवारी अनिल परब यांनी कॅबिनेटची मिटिंग आटोपून मुख्यमंत्री यांची भेट घेऊन दुपारी तीन वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते, सलग दुसऱ्या दिवशी परब यांच्याकडे चौकशी सुरू असून सात तासांपासून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्रात जोवर हे नाट्य सुरु आहे, तोवर मला चौकशीला बोलावले जाईल अस दिसते, पण मी चौकशीत सहकार्य करत आहे. शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच झाला आहे आणि शिवसेना तो करेल. मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियाद्वारे सांगितले होते की ते शासकीय निवासस्थान सोडतील त्यानुसार त्यांनी सोडलेले आहे, असे मंत्री अनिल परब म्हणाले. परब यांना गुरुवार, २३ जून रोजी इडीने चौकशीला बोलावले आहे. परब यांना बुधवारी, २२ जून रोजी रात्री १० वाजता सोडले.