राज्य सरकारने खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची नुकतीच घोषणा केली. खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयाची घोषणा होताच गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. परिणामी गोरेगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील प्राण्यांचा बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे ठप्प झाला आहे तर परळ येथील बैलघोडा रुग्णालयातील कामावरही परिणाम दिसून येत आहे.
राज्य सरकारने पशुसंवर्धक विषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. पदविका अभ्यासक्रमासंदर्भात व्हेटरनरी काऊंन्सिल ऑफ इंडियाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. ही मार्गदर्शक तत्त्वे जारी होईपर्यंत हा अभ्यासक्रम रद्द करण्यात यावा, अभ्यासक्रमाचे नाव नर्सिंग इन ॲनिमल हेल्थ करण्यात यावे या दोन प्रमुख मागण्या पशुवैद्यकीय रुग्णालयात शिकणाऱ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केले आहे.
(हेही वाचा – भारतीय महिला तिरंदाजी संघाची ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ कम्पाऊंड प्रकारात पटकावले सुवर्ण पदक)
प्राण्यांच्या रुग्णालयीन सेवेवर परिणाम –
- गोरेगाव येथील रुग्णालयात दररोज साधारणपणे ६० ते ७० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. संपमुळे प्राण्यांना खासगी किंवा परळ येथील रुग्णालयात न्यावे लागत असल्याचे प्राण्यांच्या मालकांनी सांगितले.
- परळ येथे संपामुळे रुग्णालयातील विविध तपासण्या करणे, प्रयोगशाळा, वैद्यकीय विभाग आणि पॅरावैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community