ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयातच, प्रकृती उत्तम

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज पुण्यातील रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारेंच्या छातीत दुखत असल्याने गुरूवारी सकाळी त्यांना दाखल केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले आहे. अण्णा हजारे यांना छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर एन्जॉग्राफी करण्यात आली, तसेच डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

(हेही वाचा – ठरलं! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार)

अण्णा हजारांची प्रकृती स्थिर

गेल्या 2-3 दिवसांपासून अण्णा हजारे यांच्या छातीत हलके दुखत असल्याची तक्रार होती. रुबी हॉल क्लिनिकमधील तज्ज्ञांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यानंतर ईसीजीमध्ये किरकोळ बदल दिसून आले, त्यानंतर डॉ. पीके ग्रांट आणि डॉ. सीएन मखले यांनी अँजिओग्राफी केली. मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पीके ग्रँट यांनी असे सांगितले की, “अँजिओग्राममध्ये त्याच्या धमनीमध्ये किरकोळ ब्लॉकेज असल्याचे दिसून आले, ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि त्याला योग्य वैद्यकीय उपचार मिळत आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. 2-3 दिवसात डिस्चार्ज होईल.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here