Freedom Fighter Annapurna Maharana : इंग्रजांना आव्हान देणारी महिला स्वातंत्र्यसैनिक अन्नपूर्णा महाराणा

Freedom Fighter Annapurna Maharana अन्नपूर्णा महाराणा यांना लोक 'चुनी आपा' असे म्हणायचे. अन्नपूर्णा यांच्या आईचे नाव रमा देवी आणि वडिलांचे नाव गोपबंधू चौधरी. हे देखील स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते आणि म्हणूनच त्यांना राजकारणाचा वारसा लाभला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली.

251
Freedom Fighter Annapurna Maharana : इंग्रजांना आव्हान देणारी महिला स्वातंत्र्यसैनिक अन्नपूर्णा महाराणा
Freedom Fighter Annapurna Maharana : इंग्रजांना आव्हान देणारी महिला स्वातंत्र्यसैनिक अन्नपूर्णा महाराणा

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात महिलांनी मोठा त्याग केला आहे. (Freedom Fighter Annapurna Maharana) सशस्त्र आणि अहिंसावादी अशा दोन्ही क्रांतिकारकांचा या लढ्यात सहभाग होता. सावरकरांनी स्वातंत्र्याचे श्रेय केवळ स्वतःकडे न ठेवता सर्वांनाच दिले आहे. आज आपण एका महिला क्रांतिकारकाबद्दल जाणून घेणार आहेत. या महान क्रांतिकारकाचं नाव आहे अन्नपूर्णा महाराणा. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.

त्यांना लोक ‘चुनी आपा’ असे म्हणायचे. अन्नपूर्णा यांच्या आईचे नाव रमा देवी आणि वडिलांचे नाव गोपबंधू चौधरी. हे देखील स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते आणि म्हणूनच त्यांना राजकारणाचा वारसा लाभला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली. इंदिरा गांधींनी स्थापन केलेल्या ‘बानर सेना’ या बाल ब्रिगेडचा भाग बनून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात पहिले पाऊल टाकले. (Freedom Fighter Annapurna Maharana)

(हेही वाचा – Matheran : नेरळ-माथेरान दरम्यान मिनी ट्रेन सेवा ४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होणार)

पुढे त्यांचा लढा सुरुच राहिला. १९३४ मध्ये महात्मा गांधींच्या पुरी ते ओडिशातील भद्रकपर्यंतच्या “हरिजन पदयात्रा” रॅलीत त्यांनी सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात आणि ‘सविनय कायदेभंग’ मोहिमेदरम्यान अन्नपूर्णा यांना अनेक वेळा तुरुंगवारी करावी लागली आहे. तसेच १९४२ ते १९४४ या काळात त्यांना ओडिशातील कटक तुरुंगात कैद करून ठेवले होते. परंतु त्या डगमगल्या नाहीत. उलट तुरुंगातच त्यांना समाजसेवा करण्याची जाणीव झाली. (Freedom Fighter Annapurna Maharana)

अन्नपूर्णा या केवळ क्रांतिकारक नव्हत्या, तर समाजसेविका देखील होत्या. डाकूंनी वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गावर यावं म्हणून त्यांनी चंबळ खोर्‍यातील डाकूंच्या पुनर्वसनासाठी काम केले होते. ओडिशातील रायगडा जिल्ह्यात त्यांनी वनवासी मुलांसाठी शाळा सुरु केली. विनोबा भावे यांनी सुरु केलेल्या भूदान चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

स्वातंत्र्यानंतर आणीबाणीमध्ये त्या सक्रिय होत्या. सरकारच्या विरोधात त्यांनी जनजागृती केली. त्या चळवळीदरम्यानही त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्यांना साहित्य क्षेत्रात गती प्राप्त झालेली होती. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या हिंदी लेखांचा त्यांनी उडिया भाषेत अनुवाद केला आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी त्या या मर्त्यलोकातून निघून गेल्या. मात्र त्यांनी केलेले कार्य आजही महिलांना प्रोत्साहन देत आहे. (Freedom Fighter Annapurna Maharana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.