वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे प्रत्येकालाच आवडतं. मग त्या शुभेच्छा तुमच्या (Anniversary Wishes In Marathi) जोडीदारासाठी असो, आई-वडिलांसाठी असो, मित्रांसाठी असो किंवा सहकाऱ्यांसाठी असो. मात्र प्रत्येकालाच शुभेच्छा देता येतात असं नाही. तर आज आपण साध्या – सहज पण सुंदर शुभेच्छा कशा लिहायचा हे पाहूया.
(हेही वाचा – luxury Resorts In Rishikesh: ऋषिकेशमधील सर्वोत्तम रिसॉर्टस् कोणते? जाणून घ्या…)
काही टिप्स वापरून तुम्ही छान शुभेच्छा देऊ शकता :
१. उबदार शुभेच्छांनी सुरुवात करा :
तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची (Anniversary Wishes In Marathi) सुरुवात नेहमी उबदार आणि पारंपरिक शुभेच्छांनी करा. उदाहरणार्थ, तुम्ही ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ ने सुरुवात करू शकता! किंवा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन, वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा, जीवेत शरद: शतम् अशी सुरुवात करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
२. तुमच्या भावना व्यक्त करा :
जर तुम्हाला तुमच्या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Anniversary Wishes In Marathi) द्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या मनातील भावना सुंदर शब्दात मांडा. तुम्ही असे काहीतरी म्हणू शकता, “तुझं प्रेम आणि सहवास माझ्या सुखी आयुष्याचं उत्तम उदाहरण आहे” असं लिहून तुम्ही तुमच्या शुभेच्छांची सुरुवात करू शकता.
(हेही वाचा – luxury resorts in bangalore : बेंगळुरूमधील लक्झरी रिसॉर्ट शोधताय, मग ‘ही’ बातमी वाचाच…)
३. यशावर प्रकाश टाका :
तुमचे गुरु, शिक्षक किंवा अशा व्यक्ती ज्यांच्याकडून तुम्ही सतत शिकत असता अशा व्यक्तींना शुभेच्छा (Anniversary Wishes In Marathi) देताना तुम्ही तुम्ही त्यांच्याकडून काय काय शिकलात यावर प्रकाश टाका. म्हणजेच “तुमच्याकडून घेतलेले प्रत्येक धडे अद्वितीय आहे”, “तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण काहीनाकाही शिकवून गेले” अशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
४. भविष्यासाठी आशीर्वाद द्या :
तुमच्यापेक्षा लहान व्यक्तींना शुभेच्छा (Anniversary Wishes In Marathi) देतांना त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. “तुझं पुढील आयुष्य सुख, समृद्धी, आणि निरोगी होवो”
(हेही वाचा – Mussoorie Hotels : टेकड्यांची राणी-मसुरीमध्ये फिरायला जाताय तर ‘या’ हॉटेल्समध्ये रहा…)
५. एका गोड समारोपाने शेवट करा
एका गोड आणि उत्साहवर्धक समारोपाने तुमच्या शुभेच्छांचा (Anniversary Wishes In Marathi) समारोप करा. उदाहरणार्थ, तुम्ही असे म्हणू शकता की; “तुमचा वाढदिवस साजरा करणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आणि सुखद आहे. तुमचे प्रत्येक दिवस असेच आनंदात आणि उत्साहात जावो.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community