anniversary wishes in marathi : विवाह (marriage) हा दोन व्यक्तींच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो, जिथे प्रेम, विश्वास, आणि आपुलकी यांचे बंध घट्ट होतात. दरवर्षी येणारा विवाहाचा वाढदिवस (wedding anniversary) हा त्या प्रेमाचा उत्सव असतो. हा दिवस केवळ एकत्र राहण्याच्या आठवणींचा आनंद घेण्यासाठी नसतो, तर पुढील आयुष्य अधिक आनंदी आणि प्रेमाने परिपूर्ण करण्याची संधीही देतो. (anniversary wishes in marathi)
लग्न विवाहाच्या वाढदिवसानिमित्त नातेवाईक आणि मित्रपरिवार आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा…
तुमची जोडी कायम राहो
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो
आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
नात्यातले आपले बंध
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुम्हा दोघांचं प्रेम
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !