तब्बल 900 कोटींचे हेरॉईन जप्त!

गुजरात एटीएसने शाहीन बाग येथून अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर हैदरशी निगडीत यूपीतील मुझफ्फरनगर येथील अड्ड्यावरुन 150 किलोहून अधिक हेरॉइन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल 900 कोटी रुपये आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) हैदरला शाहीन बाग येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. शाहीन बागमधील त्याच्या घरातून 300 कोटी रुपये किमतीचे 50 किलो हेरॉइन, 30 लाख रोकड आणि 47 किलो इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गुजरात एटीएसनं हैदरच्या मुझफ्फरनगर येथील घराच्या शेजाऱ्याच्या घरावर छापा टाकला आणि तब्बल 150 किलो हेरॉइन जप्त केले.

ड्रग्जचे पैसे होत होते दुबईमध्ये रवाना

यासंदर्भात एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात लक्ष्मीनगरमधून हवाला व्यापारी शमीम याला अटक केली आहे. हाच व्यक्ती ड्रग्जचे पैसे दुबईमध्ये शाहिदला पाठवत होता. आतापर्यंत या सिंडिकेटमध्ये एकूण 5 लोकांना अटक करण्यात आली आहे. या सिंडिकेटचे कनेक्शन थेट दुबई, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणशी असल्याची माहिती पुढे आलीय.

(हेही वाचा – शाहीन बाग पुन्हा आले चर्चेत! ५० किलो ड्रग्ज, ३० लाखांची रोकड सापडली)

आरोपींची चौकशी करणार

अटारी बॉर्डर आणि गुजरातमध्ये जे हेरॉइन जप्त करण्यात आले आहे त्या सर्वांचा सोर्स एकच असल्याचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. यासाठी आमची टीम गुजरात आणि अटारी बॉर्डरवर पकडण्यात आलेल्या आरोपींचीही चौकशी करणार आहे. आम्ही जे आरोपी पकडले आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी कस्टम विभागाची टीम आली असल्याचंही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here