तुर्कीये मध्ये पुन्हा भूकंप; 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप, काही इमारती कोसळल्या

138

तुर्की आणि सीरिया पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तुर्की आणि सिरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप झाला आहे. हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रेतचा असल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, 200 हून अधिक जण जखमी आहेत. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरु असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन लाख घरांचे काम तातडीने सुरु करणार

 तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून, 213 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी सोमवारी हाते प्रांताचा दौरा केला. सरकार पुढील महिन्यात भूकंपग्रस्त भागात जवळपास दोन लाख घरांचे काम तातडीने सुरु करणार आहे.

14 दिवसांनंतर पुन्हा भूंकपाचे धक्के

14 दिवसांनंतर आलेल्या या भूंकपामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपानंतर मदत आणि बचाव पथकाने भूंकपग्रस्त भागाकडे धाव घेतली असून, अजूनही बचावकार्य सुरु आहे. 14 दिवसांपूर्वी जेव्हा भूकंप आला त्यावेळी अनेक इमारतींना तडे गेले होते. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या होत्या. अनेकजणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. काहींची घरे जमीनदोस्त झाली तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा इमारतींना धोकादायक इमारती म्हणून घोषित केले होते. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणा-या नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये पाठवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.