‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात शिवसेनेचा दुसरा आमदार

119

एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून त्या व्यक्तीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेते, आमदार देखील अडकत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. महिन्याभरापूर्वी कुर्ल्यातील शिवसेनेच्या एका आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्यात आल्यानंतर शिवसेनेचाच आणखी एक आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची दुसरी घटना पश्चिम उपनगतील दहिसर येथे समोर आली आहे.

आमदार सुर्वे यांच्याकडे ५ हजार मागितले

मागोठाणे विधानसभा शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना सायबर गुन्हेगारांनी सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून त्यांचा मॉर्फ करण्यात आलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार दहिसर येथे घडला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

(हेही वाचा ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प मंजूर, पण महापालिकेच्या भरवशावर)

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

१६ नोव्हेंबर रोजी प्रकाश सुर्वे यांच्या मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्स अॅपवर एक मेसेज आला होता, अनोळखी मोबाईल क्रमांक असल्यामुळे त्यांनी त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले, रात्री ११ वाजता पुन्हा सुर्वे यांना “हॅलो, क्या हुआ जी” असा मेसेज आला आणि त्यानंतर त्यांना व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉल आला. या व्हिडिओ कॉलमध्ये एक महिला अश्लील कृत्य करताना दिसली होती आणि नंतर त्याच क्रमांकावरून एका व्यक्तीने सुर्वे यांचा व्हिडिओ मॉर्फ करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. महिन्याभरापूर्वी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या सोबत देखील असाच प्रकार घडला होता हे लक्षात येताच सुर्वे यांनी तात्काळ दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली आहे.

असा कट रचला

मुंबईचे विधानसभा सदस्य (आमदार) प्रकाश सुर्वे यांनी नुकतीच दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओ कॉल मध्ये एक महिला अश्लील कृत्य करताना दिसली होती, सुर्वे यांनी तात्काळ कॉल बंद केला आणि काही वेळाने त्याच नंबरवरून एका व्यक्तीने सुर्वे यांचा व्हिडिओ मॉर्फ करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन समोरच्या व्यक्तीने सुर्वे यांच्याकडे ५ हजार रुपयांची खंडणीची मागणी केली होती. मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुर्वे यांनी सांगितले की, मला दिवसभरात अनेक कॉल येत असतात, अनेक जण व्हॉट्स अॅपवर मदतीसाठी मेसेज देखील करतात, मी प्रत्येकाच्या फोनला उत्तर देत असतो, त्या प्रकारे मी त्या रात्री कॉल उचलतात हा प्रकार घडला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.