पुण्यात अंमली पदार्थ तस्कराला बेड्या, १० लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त

121

पुणे जिल्ह्यातील कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANS) 10 लाख रुपये किमतीच्या मेफेड्रोनसह अंमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी (32) नावाच्या या ड्रग्ज तस्कराची कसून चौकशी करत आहे.

(हेही वाचा – शेतकऱ्यांनी आधी यांच्यावर आसूड ओढायला हवा, दानवेंचा ठाकरेंवर घणाघात)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला कोंढवा परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची पूर्व माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या नेतृत्वाखाली एएनएस पथक रविवारी रात्री कोंढवा परिसरात नजर ठेवून होते. कोंढव्यातील उंड्री-पिसोळी परिसरातील हॉटेलजवळ मेफेड्रोन विकण्यासाठी एक व्यक्ती कारमधून येताच एएनएसच्या पथकाने त्याला पकडले आणि त्याची झडती घेतली. त्याच्याकडून १० लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन सापडले, त्यावर एएनएसने त्याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी याच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक इतर ड्रग्ज तस्करांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.