महाराष्ट्रातील उद्योग बंद करून गुजरातला हलवण्यात आहेत, भाजपाच्या (BJP) राजवटीत हे कारस्थान केले जात आहे, असा आरोप दोन्ही काँग्रेस आणि उबाठा गट करत आहे. मात्र सोशल मीडियात जी पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे, त्यावरून या आरोपांचे खंडन होताना दिसत आहे. मनसेचे नेते अरविंद गावडे यांनी ही पोस्ट पुन्हा व्हायरल केली आहे. त्यामध्ये काँग्रेस आघाडीच्या काळात १९९० पासून कोणकोणते उद्योग मुंबई आणि महामुंबई परिसरातील बंद पडले यांची यादीच जाहीर केली आहे.
ज्या काळात देशात आणि राज्यात काँग्रेस सत्तेत होती, त्या काळात हे उद्योग बंद पडले होते. ह्या सर्व कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलविण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार झाले. त्या वेळी मोदीजी किंवा भाजपा (BJP) सत्तेत होते का? देशात, राज्यात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेस नेत्यांची नजर ही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती. जे लोक आज बोंबलतात, उद्योगधंदे गुजरातला नेले त्यांनी याचे उत्तर द्यावे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
90च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे
- मोरारजी मिल
- सेंच्युरी मिल
- मोफललाल मिल
- युनायटेड मिल
- खटाव मिल
- पोदार मिल
- प्रकाश कॉटन मिल
- रघुवंशी मिल
- स्वदेशी मिल
- कमला मिल
- कोहिनूर मिल
- इंडिया युनायटेड मिल
भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परेल, दादर या भागातील अशा एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या आणि हे उद्योग कुठे हलविले? हे इथेच थांबले नाही तर सायन ते मुलुंड येथील उद्योगधंदेही बंद पाडण्यात आले.
(हेही वाचा ऐन निवडणुकीत Sanjay Raut यांच्या अडचणींत वाढ; गुन्हा दाखल)
2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे
- प्रीमियर, पद्मिनी कुर्ला
- मुकुंद कंपनी कुर्ला
- हिंदुस्थान लिवर घाटकोपर
- अनासीन कंपनी घाटकोपर
- गोदरेज 80 % बंद घाटकोपर
- सिपला फार्मसी विक्रोळी
- आर आर पेंट विक्रोळी
- एशियन पेंट विक्रोळी
- जॉली बोर्ड कंजूरमार्ग
- सीएट टायर्स कंजूरमार्ग
- रोहन पॉलिमर कंजूरमार्ग
- बॉम्बे ऑक्सिजन भांडुप
- रिचर्डसन क्रूडस भांडुप
- रॅलीवुल्फ मुलुंड
- जॉन्सन & जॉन्सन मुलुंड
नवी मुंबई येथील बंद पडलेल्या कंपन्या
- नोसिल केमिकल घणसोली
- भारत बिजली ऐरोली
- सीमेन्स घणसोली
- ह्याड्रीला केमिकल जुईनगर
- सिपीसी कपंनी ऐरोली
- प्रॉक्टर अँड गँम्बल कपंनी दिघा
1990 ते 2000 मध्ये ठाणे घोडबंदर, बाळकूम, कोलशेत, पोखरण रोड वरील बंद पडलेल्या कंपन्या
- व्होलटास
- कलर केम
- स्टार इंडिया
- सॅन्डोझ
- बायर इंडिया
- किरण मिल
- कॅसल मिल
- पेपर प्रॉडक्ट
- वायमन गार्डन
- गँस्को इंडिया
- कॅडबरी
- गोल्डन डाईज
Join Our WhatsApp Community