‘अँटी ड्रोन सिस्टम’ प्रकल्प ‘या’ शहरात उभारणार

84

ड्रोन हल्ला रोखण्यासाठी नवीमुंबई येथील महापे या ठिकाणी ‘अँटी ड्रोन सिस्टम’ हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने महापे येथे जवळपास १ लाख चौरसफुटाची जागा घेतली आहे, हा प्रकल्प साधारण ९०० कोटी रुपयांचा असणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वीच राज्य सरकारने ही यंत्रणा विकत घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. परंतु या प्रक्रिया जलदगतीने होणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी व्यक्त केले आहे.

अँटी ड्रोन सिस्टम प्रक्रिया उभारण्याची गरज

पंजाब आणि जम्मू काश्मीर मध्ये ड्रोन माध्यमातून स्फोटके आणि अमली पदार्थ पाकिस्तान मधून पाठवले जात असल्याचे नुकतेच उघडकीस आल्यानंतर देशावर सायबर हल्ले अथवा ड्रोन हल्ल्याची शक्यता वाढली आहे. सायबर हल्ले आणि ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्याचा धोका महाराष्ट्राला देखील असल्याचे नुकतेच दहशतवाद्यांच्या डार्क नेटवरील संभाषणातून समोर आले आहे. हे ड्रोन हल्ले रोखणारी यंत्रणा राज्यात कार्यान्वित नसल्यामुळे या प्रकारचे हल्ले मुंबईसह इतर शहरामध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे लवकरात लवकर ही अँटी ड्रोन सिस्टम प्रक्रिया उभारण्याची गरज असल्याचे यशस्वी यादव यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : महेश मांजरेकरांकडून मराठी संस्कृतीची अश्लील विटंबना! ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदीची मागणी )

९०० कोटीचा प्रकल्प

ड्रोन च्या माध्यमातून हल्ला करण्यासाठी २० ते ३० किलोमीटर अंतरावरून लक्ष साधले जाऊ शकते, ड्रोनवर पेलोड बसवता येतात. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी ज्या पद्धतीने त्याच्या मोबाईल ट्रॅक केला जातो त्या पद्धतीने ड्रोनला ट्रॅक करता येत नाही त्यामुळे हे हल्ले रोखणारी यंत्रणाच कार्यन्वित असायला हवी असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्य सरकारने ३ वर्षांपूर्वीच या प्रकल्पासाठी नवीमुंबईतील महापे या ठिकाणी एका लाख चौरस फुटाची जागा निश्चित केली आहे, या जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून हा प्रकल्प ९०० कोटीचा आहे. परंतु या प्रक्रिया जलदगतीने होणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.