महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी, धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करा – हिंदुत्वनिष्ठ संघटना

152

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि हिंदूंचे धर्मांतर यांविषयीच्या वाढत्या घटना पाहता राज्यात तातडीने लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, या मागण्यांसाठी ठाणे (प) रेल्वे स्थानकाबाहेर हिंदु-राष्ट्र जागृतीने आंदोलन केले.

यावेळी आंदोलनात हिंदू महासभा, श्रीराम प्रतिष्ठान हिंदुस्थान, वंदे मातरम प्रतिष्ठान, श्रीराम हिंदू संघटन, अखिल भारतीय कोरी सभा, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा यांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या धर्मप्रेमी हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. यावेळी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांत वाढ 

राज्यात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. अनेक माध्यमांतून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतरण करुन त्यांच्याशी ‘निकाह’ केला जातो. यामध्ये हिंदु युवतींचे भयंकर शोषण केले जाते. वसई येथील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची लव्ह-जिहादी आफताबने 35 तुकडे करुन केलेली निघृण हत्या तसेच मुंबईतील टिळकनगर येथे राहणारी रुपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तिचा पती इक्बाल मोहम्मद शेखने केलेली हत्या यांसह ‘लव्ह जिहाद’ विषयची अनेक गंभीर प्रकरणे आता उघड होत आहेत आणि जनतेमध्येही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाविषयी रोष आता व्यक्त होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली.

( हेही वाचा: Income Tax: आनंदाची बातमी! आता ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही कर? )

…म्हणून धर्मांतर बंदी कायदा तातडीने लागू व्हावा

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच’ असे म्हटले होते. पुन्हा भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर धर्मांतरबंदी व्हायलाच हवी. म्हणूनच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.