परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ! सीआयडी करणार ‘या’ प्रकरणाचा तपास

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुरू असलेले चौकशीचे आणखी एक प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. डांगे यांनी सिंग यांच्यावर भ्रष्टाचार आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सीआयडीने डांगे यांचा जबाब नोंदवण्यासाठी सोमवारी सीआयडीच्या बेलापूर येथील कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

काय होता परमबीर सिंग यांच्यावर आरोप

तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी माझ्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती व सिंग यांचा थेट संबध पब मालक आणि अंडरवर्ल्डशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत होते, मात्र वर्ष उलटूनही या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कुठलाही तपास केलेला नसल्याचा आरोप डिसेंबर महिन्यात गृहविभागाकडे केला होता.

(हेही वाचा- ED चा नवा पत्ता ऐकला का? अंडरवर्ल्ड दाऊदचा हस्तक ड्रग्ज तस्करच्या जागेत नवं कार्यालय)

आता गुन्हे अन्वेषण विभागकडे तपास

गृहविभागाने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग केला असून याप्रकरणी जबाब नोंदवून घेण्यासाठी सीआयडीने अनुप डांगे यांना रविवारी समन्स पाठवून सोमवारी सीआयडी कार्यालयात बोलावले आहे. अनुप डांगे हे सीआयडी कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी बेलापूर येथील कार्यालयात दाखल झाले असुम त्यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here