अनुराग कश्यप, तापसीने ३५० कोटींचा कर बुडवल्याचा संशय  

आयकर विभागाचे दोन दिवसांपासून सुरु केलेले धाड सत्र सुरूच असून मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैद्राबाद या ठिकाणी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल २८ ठिकाणी छापे मारले आहेत. 

आयकर खात्याने बुधवारी दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि विकास बहाल यांच्या घरांवर सुरु केलेली छापेमारी सुरु केली असून आयकर विभागाला यातून किमान ३५० कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणी या तिघांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

तापसी पन्नूकडे ५ कोटी रुपयांच्या खोट्या पावत्या! 

आयकर विभागाने गुरुवारी मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैद्राबाद या ठिकाणी जाऊन तब्बल २८ ठिकाणी छापे मारले. यात आयकर विभागाला या छापेमारीत तब्बल ३५० कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तापसी पन्नू कडून ५ कोटी रुपयाच्या पावत्या सापडल्या आहेत, ज्या प्रत्यक्ष खर्च ना केलेल्या गोष्टींवरील आहेत, याचा अर्थ त्या पावत्या खोट्या असून त्यातून तिने २० लाख रुपयांचा कर चुकवला असल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा : बाबरीवरून महाआघाडीचे ‘पतन’?)

७ बँक लॉकर्स हाती लागले! 

दोन टॅलेंट कंपन्या (फैंटम आणि क्वान) यांच्याकडून मोठ्या रकमेचा डिजीटल डेटा व्हॉट्सअॅप, इमेल हार्ड डिस्कसह जप्त केले आहे. तसेच ७ बँक लॉकर्स सापडले आहेत, जे आयकर विभागाने ताब्यात घेतले आहेत.  सर्च ऑपरेशन आणि चौकशी अजूनही सुरुच आहे.

अनुराग कश्यप यांची वादग्रस्त पार्श्वभूमी!

  • दिग्दर्शक अनुराग कश्यप हे जेव्हापासून मोदी सरकार सत्तेवर आले आहे, तेव्हापासून सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. ही टीकाही अत्यंत जहरी असते.
  • ‘मी टू’ या मोहिमेच्या अंतर्गत जेव्हा बॉलिवूडमधील महिला अत्याचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागली, तेव्हा अभिनेत्री पायल घोष हिनेही कश्यप यांच्यावर त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला.
  • त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली होती.
  • कंगणा जेव्हा जेव्हा केंद्र सरकारच्या बाजूने सोशल मीडियातून मतप्रदर्शन करतात, तेव्हा कश्यप त्यांचा प्रतिवाद करत ट्विटरवॉर करतात.

तापसी पन्नू आणि कंगना यांच्यात वाद

कंगनाने अनुराग कश्यप यांना महिला कलाकारांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात यावी, अशी मागणी केल्यावर कश्यप यांच्या बाजूने काही अभिनेत्री उभ्या राहिल्या. त्यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू ही देखील होती. त्यांनतर तापसी पन्नू आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावरून ट्विटर वॉर सुरु झाले. अनुराग कश्यप आणि तपासू पन्नू हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्वतः तापसी पन्नूने सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here