- ऋजुता लुकतुके
फुटबॉलच काय कुठलाही खेळ म्हटलं की, त्यासाठी ग्लोव्ह्ज, बूट, किट असं साहित्य लागतं. आणि त्यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कंपन्या आहेत नाईकी, आदिदास, प्युमा इत्यादी. पण, या कंपन्यांची उत्पादनं असतातही महाग. अशावेळी जागतिक टॉपच्या कंपन्यांमध्ये एक भारतीय कंपनी शिरकाव करु पाहते आहे. जागतिक स्तरावर नाही पण, सध्या भारतात ही कंपनी आपलं नाव कमावून आहे. सत्यसाई इंटरनॅशनल या कंपनीचा आंझा हा ब्रँड भारतात माहीत नाही, असे लोक विरळाच आढळतील. (Anza Football Boots)
क्रिकेटची लोकप्रियता शीगेवर असलेल्या भारतात कंपनीने आपला अंझा हा ब्रँड रुजवला आहे तो फुटबॉलचं साहित्य बनवून. त्यांचे किमान १४ प्रकारचे फुटबॉल बूट भारतात प्रसिद्ध आहेत. पंजाबमध्ये जालंधर इथं मुख्यालय आणि कारखाना असलेली ही कंपनी वर्षाला २ ते ५ लाखांपर्यंत उलाढाल करते. २००९ मध्ये तिची स्थापना झाली आहे. (Anza Football Boots)
Advertisment for Anza Rhombo Football Boots#AnzaRhombo #FootyBoots #Ads pic.twitter.com/stnS4S8z1U
— Football Memories (@footballmemorys) November 25, 2023
जागतिक ब्रँडच्या भाऊ गर्दीत आंझाने आपलं स्थान कसं मिळवलं, ही कंपनी भारतात गेमचेंजर ठरली कशी, याची कारणं पाहूया, (Anza Football Boots)
नवीन रंगसंगती, आकर्षक डिझाईन
कुठल्याही ऑनलाईन ई-कॉमर्स साईटवर गेलात आणि आंझा फुटबॉल बूट किंवा शूज असे शब्द टाईप केलेत की, तुमच्यासमोर किमान २० उत्पादनं येतील. आणि ही सगळी आकर्षक रंगात आणि नवीन स्टाईलमध्ये असलेली तुम्हाला दिसतील. भारतात लोकांना दर्जा इतकाच वस्तूंचा लुक आवडतो. आणि हे लक्षात घेऊन फ्लूरोसंट हिरवा आणि निळा रंग वापरत कंपनीने आपले बूट बनवले आहेत. आणि लोकांना ते आवडतायत. (Anza Football Boots)
(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : असा मिळाला अश्विनला ५००वा बळी)
किफायतशीर किंमत
सुपरकोपा, गाबा, स्टड अशा आकर्षक नावांची सीरिज कंपनीकडे आहे. पण, त्या सगळ्याची किंमत अगदीच किफायतशीर म्हणजे अनेकदा हजार किंवा दिडशेच्या आत आहे. जी मुलं प्रत्यक्ष खेळाचं प्रशिक्षण घेतात त्यांना काही महिन्यांतच नवीन जोड लागतो. अशावेळी ब्रँडेड कंपन्यांचे बूट घेताना त्यावर खर्चही वारेमाप होतो. पण, कंपनीने आपली उत्पादनं किफायतशीर दरांत उपलब्ध करून भारतीय बाजारपेठेत बाजी मारली आहे. (Anza Football Boots)
बाजारातील उपलब्धता
आंझा हा ब्रँड तसा भारतात आता कुठे रुजतोय. कारण, ई कॉमर्सच्या जमान्यात कंपनीने ऑनलाईन मार्केटिंगला महत्त्व दिलंय. आणि देशभर ते उत्पादनं घरपोच पोहोचवतात. कुठल्याही ई-कॉमर्स साईटवर त्यांची उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी दाम आणि टिकाऊ काम असा अजेंडा घेऊन बाजारात आलेले अंझाचे बूट भारतात गेमचेंजर ठरले आहेत. (Anza Football Boots)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community