-
ऋजुता लुकतुके
अपोलो हॉस्पिटल एंटरप्रायजेस कंपनीने गेल्या महिन्याभरात वर्षभरातील आपला उच्चांक नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ६३ टक्के नफा कमावल्यावर हा शेअर सुसाट सुटला आहे. कर भरण्यापूर्वाची नफाही ३० टक्क्यांनी वाढला होता. या निकालांमुळे अपोलो हॉस्पिटल शेअर महिनाभरातच ७,५०० रुपयांचा टप्पा पार करून गेला. आताही हा शेअर ७,२०० रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. (Apollo Hospital Share)
(हेही वाचा- Maharashtra Legislature Special Session 2024 : विरोधी पक्षांचे आमदार शपथ घेणार नाहीत; नेमकं कारण काय?)
पण, या शेअरची पुढील वाटचाल नेमकी कशी असणार आहे? कंपनीच्या शेअरला अचानक जी उसळी मिळाली ती अपोलो हॉस्पिटलच्या तीन महिन्यातील कामगिरीच्या आधारे होती. अपोलो हॉस्पिटलचं जाळं देशभर पसरलेलं आहे. आणि सध्या कंपनीने देशभरात मिळून ९,४२३ रुग्ण खाटा आहेत. आणि तिमाही निकालांमध्ये यातील ७३ टक्के खाटा या तिमाहीत कायम भरलेल्या होत्या. हे प्रमाण याच तिमाहीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी जास्त होतं. (Apollo Hospital Share)
शिवाय कंपनीच्या लॅबोरेटरी उद्योगानेही नवीन विक्रम केला आहे. त्याचा परिणाम शेअरवर सध्या दिसून येत आहे. पण, जाणकारांच्या मते गेल्या महिनभरातील फुगवटा हा येणाऱ्या सहा महिन्यात कमी होऊ शकतो. त्यामुळे जेपी मॉर्गन या संशोधन संस्थेनं अपोलो हॉस्पिटलचा शेअर ७,२०० रुपयांपर्यंत खाली उतरेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तिमाही निकाल मात्र अपेक्षेनुसार लागल्याचं जेपी मॉर्गन यांनी म्हटलं आहे. आणि निकालांनंतर ही वाढही अपेक्षित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. (Apollo Hospital Share)
(हेही वाचा- Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल)
पण, मागच्या वर्षभरात हा शेअर मूळातच ३५ टक्क्यांनी वधारला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून हा फुगवटा थोडा कमी होणं गरजेचं असल्याचं मत संस्थेनं मांडलं आहे. (Apollo Hospital Share)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि वाचकांनी आपल्या जबाबदारीवर ही गुंतवणूक करावी. वरील मतं ही संशोधन संस्थांची आहेत. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी – विक्रीवर कोणताही सल्ला देत नाही.)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community