Apple Vs Twitter: अ‍ॅपलवरुन ट्वीटर अ‍ॅप हटवले जाणार; एलाॅन मस्क यांची अ‍ॅपलला धमकी

115

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्वीटरचे मालक एलाॅन मस्क हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ट्वीटर विकत घेतल्यापासून एलाॅन मस्क यांनी निर्णयांचा धडाका लावला आणि संपूर्ण टेक वर्ल्डमध्ये खळबळ माजली. पण आता एका नव्या ट्वीटमुळे एलाॅन मस्क पुन्हा चर्चेत आले आहेत. एलाॅन मस्क यांनी एक ट्वीट करत अॅपल स्टोअरवर लावण्यात आलेल्या परवानगी आणि कठोर निर्बंध यांसारख्या गोष्टींवर टीका केली आहे. तसेच, मस्क यांनी अप्रत्यक्षरित्या अॅप स्टोअरवरुन ट्वीटर हटवण्याची धमकी दिली आहे.

( हेही वाचा: द कश्मीर फाइल्स: IFFI च्या लोकांना कसे दिसणार सत्य? )

मस्क यांचे अॅपवर गंभीर आरोप 

एलाॅन मस्क यांनी आपल्या ट्वीटर खात्यावर काही सलग ट्वीट केले आहेत. ट्वीट करत अॅपल कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. अॅपल कंपनीने ट्वीटरवर जाहिराती देणे जवळजवळ बंदच केले आहे. अॅपल कंपनीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भीती वाटते का? अॅपलने आणखी कोणाकोणावर अशी सेन्साॅरशीप लादलेली आहे? असे प्रश्न एलाॅन मस्क यांनी अॅपल कंपनीला विचारले आहेत.

अॅपलच्या स्टोअरवरुन ग्राहकांनी काही अॅप्स खरेदी केल्यास 30 टक्के छुपा कर आकारला जातो, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? असा सवालही एलाॅन मस्क यांनी केला आहे. ग्राहकांना प्रभावित करणा-या सर्व सेन्साॅरशीप अॅपलने सार्वजनिक करायला हव्यात का? असे विचारत एलाॅन मस्क ट्वीटरवर एक पोल घेत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेमध्येच व्यक्तिस्वातंत्र्य नसेल तर आगामी काळातील जुलूमशाहीचे हे द्योतक आहे, असा इशाराही मस्क यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.