मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अखेर तब्बल २२ दिवसांनी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या यापदावर आशिष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य शासनाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे. शर्मा यांना केंद्रातून राज्यात आणून ठाकरे सरकारने त्यांच्यावर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
२२ दिवसांनी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे ३० एप्रिल २०२१ रोजी सेवा निवृत्त झाले. त्यानंतर या रिक्त पदी कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर या रिक्तपदी शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत यांचे व्याही ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर तसेच सनदी अधिकारी डॉ. रामास्वामी यांच्या नावाची चर्चा होती, परंतु ही दोन्ही नावे मागे पडली आणि केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, शासनाने प्रधान सचिव श्रेणीत पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.
( हेही वाचा : तुम्ही सावरकरांचा विचार संपवू शकणार नाही – शरद पोंक्षे)
त्यांच्या नियुक्तीचे आदेश अप्पर मुख्य सचिव( सेवा) सुजाता सौनिक यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निघाले आहे. महापालिकेत प्रशासक नेमलेला असताना अशाप्रकारे अतिरिक्त आयुक्तपदाचे पद २२ दिवस रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रशासकीय राजवट असताना अशाप्रकारे हे पद रिक्त ठेवणे योग्य नसतानाही शासनाला या पदावर तात्काळ अधिकाऱ्याची नियुक्ती करता आलेली नाही. मुंबई महापालिकेत आजवर अतिरिक्त आयुक्त पद हे एवढे दिवस रिक्त ठेवले गेले नव्हते.
Join Our WhatsApp Community