मुंबई पोलीस दलात मोठा फेरबदल; उपायुक्तांच्या नियुक्त्या

मुंबई पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आलेला आहे, जिल्ह्याबाहेरून बदली होऊन आलेल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची विविध ठिकाणांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून गुन्हे शाखा (प्रकटीकरण १) पोलीस उपायुक्त पदी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

( हेही वाचा : सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची गोष्ट; मुंबईत उडाली होती खळबळ)

राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी राज्य भरातील १०९ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकारी यांच्या बदल्याची यादी जाहीर करण्यात आली होती. मुंबईत बदलून आलेल्या तसेच मुंबई विभागातील कार्यकाळ संपलेल्या पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या, त्यांची विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाचा कणा समजला जाणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागातील दोन्ही पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांची सायबर गुन्हे शाखा या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच सायबर गुन्हे विभागाचे हेमसिंग राजपूत यांची परिमंडळ ६ मध्ये बदली करण्यात आलेली आहे. रिक्त झालेल्या गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची वर्णी लागली असून गुन्हे शाखा १ पोलीस उपायुक्तपदी कृष्णकांत उपाध्याय यांची बदली करण्यात आली आहे.

 • परिमंडळ १ हरि बालाजी
 • परिमंडळ २ अभिनव देशमुख
 • परिमंडळ ३ अकबर पठाण
 • परिमंडळ ४ प्रवीण मुंढे
 • परिमंडळ ५ मनोज पाटील
 • परिमंडळ ६ हेमराज राजपूत
 • परिमंडळ ७ पुरुषोत्तम कराड
 • परिमंडळ ८ दीक्षित गेडाम
 • परिमंडळ ९ अनिल पारस्कर
 • परिमंडळ १० महेश्वर रेड्डी
 • परिमंडळ ११ अजय बंसल
 • परिमंडळ १२ स्मिता पाटील
 • परिमंडळ (बंदर) संजय लाटकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here