समाजशास्त्राचे पदवीधर आहात का? महापालिकेत आहे ही संधी, जाणून घ्या

123

मुंबई महापालिकेतील जेंडर बजेटच्या महिल व बालकल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरता कंत्राटी तत्वावर ११३ समुदाय संघटक पदे भरण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने अर्ज मागवण्यात आले असून येत्या २८ जून २०२२ पर्यंत हे अर्ज दादर पश्चिम येथील हॉकर्स प्लाझा इमारतीतील सहायक आयुक्त(नियोजन) विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने अर्ज पाठवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर ठोक मानधनावर केली जाणार असून प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

( हेही वाचा : रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक, हार्बर रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन)

या पदांसाठी गुणवत्तेनुसार आणि आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येणार असून मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची गठित समितीद्वारा प्रत्यक्ष मुलाखतोऊन नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचारच्या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

समुदाय संघटकाचे काय असेल काम

समुदाय संघटक हे सहायक आयुक्त(नियोजन), मुख्य समाज विकास अधिकारी व समाज विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील काम पाहतील

गरीब व गरजू महिलांचे बचत गट स्थापन करणे आणि वस्तीस्तर संघ, शहर स्तरावरील समूह स्थापित करण्याचे समुदाय संघटकांचे काम असेल. तसेच योजनेतंर्गत विविध सर्वेक्षणांना सहाय करणे.

पदनाम : समुदाय संघटक

  • एकूण भरायची पदे : ११३
  • पदासाठी वयोमान : खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे, मागास प्रवर्गासाठी १८ ते ४३ वर्षे
  • शैक्षणिक अर्हता : समाजशास्त्र विषयातील पदवी किंवा समाजकार्य विषयातील पदवी
  • मराठी टंकलेखन व इंग्रजी टंकलेखन प्रति शब्द ३०, मराठीचे ज्ञान आवश्यक
  • या संकेतस्थळावर भेट देत जाणून घ्या माहिती : http://portal.mcgm.gov.in
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ जून २०२२

अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : सहायक आयुक्त(नियोजन) यांचे कार्यालय

पाचवा मजला,जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा,

सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.