Army Day India : भारतीय सेनेच्या पराक्रमाचे स्मरण करणारा भारतीय सेना दिवस

Army Day India : १५ जानेवारी १९४९ रोजी फील्ड मार्शल केएम करिअप्पा (K. M. Cariappa) स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख बनले. तेव्हापासून दरवर्षी १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो.

238
Army Day India : भारतीय सेनेच्या पराक्रमाचे स्मरण करणारा भारतीय सेना दिवस
Army Day India : भारतीय सेनेच्या पराक्रमाचे स्मरण करणारा भारतीय सेना दिवस
भारतीय जवान म्हणजेच प्राणपणाला लावून लढणारा शूरवीर सैनिक… भारतीय सेनेने प्रचंड पराक्रम केले आहेत, शत्रूंना रणांगणात पाणी पाजले आहे. (Army Day India) त्यांचे शौर्य, त्यांचे त्याग आणि त्यांचे समर्पण आपण कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून भारतात १५ जानेवारीला भारतीय सेना दिन साजरा केला जातो.
देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन
या दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय लष्कराच्या (Indian Army) मुख्य कामगिरीवरील शक्तीप्रदर्शने, तसेच कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभरात उत्साहाचे वातावरण असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू काय आहे, चला तर आम्ही तुम्हाला याची कहाणी सांगणार आहोत.
१५ जानेवारीचे हे आहे विशेष महत्त्व
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत (India) स्वतंत्र झाला, तेव्हा देशभरात दंगली झाल्या. हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ लागल्या आणि नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पुढे यावे लागले. यानंतर फाळणीच्या वेळी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष लष्करी कमांड तयार करण्यात आली.
पहिले भारतीय लष्करप्रमुख
मात्र समस्या अशी होती की, तेव्हा भारतीय लष्करप्रमुख (Indian Army Chief) ब्रिटीश वंशाचे असायचे. १५ जानेवारी १९४९ रोजी फील्ड मार्शल केएम करिअप्पा (K. M. Cariappa) स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख बनले. त्या वेळी भारतीय सैन्यात सुमारे २ लाख सैनिक होते. त्यांच्या आधी हे पद कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर यांच्याकडे होते. तेव्हापासून दरवर्षी १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो.
केएम करिअप्पा हे फिल्ड मार्शल ही पदवी मिळविणारे पहिले अधिकारी होते. १९४७ च्या भारत-पाक युद्धात (Indo-Pak War) त्यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केले. भारतीय सेना दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊंडवर परेड काढली जाते. हा दिवस भारतीय लष्करासाठी अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस असतो. (Army Day India)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.