काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या करणाऱ्याला दोन दिवसांतच केले ठार

160

काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. या हत्येनंतर राहुल भट्ट यांच्या पत्नीने त्यांच्या पतीचे प्राण धोक्यात असताना त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप केला. त्यानंतर पुढच्या २४ तासांतच लष्कराने हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी बांदीपोरामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

भट्ट यांची कार्यालयात घुसून हत्या

मारले गेलेले दोन दहशतवादी राहुल भट्टच्या हत्येत सामील होते. तिसरा दहशतवादी गुलजार अहमद असून त्याची ओळख 11 मे रोजी झाली होती. बडगाम जिल्ह्यातील चदूरा तहसीलदार कार्यालयामध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राहुल भट्ट यांची गुरुवारी कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती आहे. काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते. बांदीपोरा येथे सुरक्षा दलांची त्यांच्याशी चकमक झाली. 11 मे रोजी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान दोघेही पळून गेले आणि सालिंदर जंगल परिसरात लपले. राहुल भट्ट यांची पत्नी मीनाक्षी हिने तिचे पतीशी १० मिनिटांपूर्वीच बोलणे झाले होते. लवकर या वाढदिवसाला जाऊ असे ती म्हणाली होती. त्यावर राहूल यांनी ठीक आहे असे म्हटले होते.

(हेही वाचा धक्कादायक! भायखळ्याच्या सेंट अँड्र्यूज शाळेकडून उन्हाळी सुटीत ख्रिस्ती धर्मप्रसार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.