संसार थाटण्यासाठी तिने केले असे, पण तुरूंगात रंगवतेय संसाराची स्वप्ने 

प्रियकरासोबत लग्न करून संसार थाटण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणीला आणि तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. एका महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ लाखाची खंडणीची मागणी या तरुणीच्या प्रियकराने प्रेयसीच्या मदतीने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच या खंडणीच्या पैशातून दोघेही संसार थाटण्याची स्वप्न पहात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

असा घडला प्रकार

ताहिरा खान (२१) आणि समशेर सलाउद्दीन चौधरी (२८) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकर प्रेयसीचे नाव आहे. घाटकोपर पश्चिमेतील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या या दोघांपैकी ताहिरा ही धारावीतील एका महिला डॉक्टरांच्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करते. ताहिरा आणि समशेर या दोघांना लग्न करून संसार थाटायचा होता. मात्र पैशांची अडचण असल्यामुळे दोघांचे लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते.

(हेही वाचा – भारतीय लष्कर ध्वज दिन, जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व)

लग्न करून संसार थाटण्यासाठी मोठी रक्कम कुठून उभी करायची या विचारात असतांना ताहिराने प्रियकराला तिच्या डॉक्टरबाबत सांगितले. डॉक्टरला भेटण्यासाठी एक तरुण येतो व दोघे बराच वेळ तिच्या केबिनमध्ये असतात अशी माहिती दिली. दरम्यान या दोघांचे एकत्र व्हिडीओ तयार करून डॉक्टरला ब्लॅकमेल करून तिच्याकडून लाखो रुपये उकळण्याची योजना समशेर याने आखली, त्याने ताहिराला एक ‘स्पाय कॅमेरा’ आणून दिला आणि डॉक्टरला नकळत तिच्या कॅबिनमध्ये लावण्यास सांगितला.

…अन् ५ लाखांची खंडणी मागितली

प्रियकराने सांगितल्याप्रमाणे ताहिराने डॉक्टरच्या कॅबिनमध्ये स्पाय कॅमेरा बसवला, या कॅमेरात डॉक्टर आणि तिच्या मित्राचे अश्लील कृत्य कैद होताच ताहिराने तो कॅमेरा समशेरला दिला. समशेरने त्या कॅमेऱ्यातील फुटेज काढून ते डॉक्टरच्या मोबाईलवर पाठवून ते फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली व मोबदल्यात ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. डॉक्टरने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुन्ह्याचा सलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष ५ यांनी देखील सुरू करून तांत्रिक बाबीवरून आरोपीचा शोध घेऊन समशेर चौधरीला अटक केली. या कामात समशेर मदत करणारी त्याची प्रेयसी ताहिरा हिला देखील खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here