बँकांच्या नावाने ‘बल्क एसएमएस’ पाठविणारा जेरबंद

सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या मोबाईल फोनवर विविध बँकांच्या नावाने एसएमएस आणि त्या सोबत लिंक पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. या प्रकारे बल्क मध्ये एसएमएस करणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराला मुंबई सायबर पोलिसांनी नुकतीच झारखंड मधून अटक केली आहे.

अशी घडली घटना

सोहराब अनाउलमियाँ अन्सारी (२६) असे अटक करण्यात आलेल्या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे. सोहराब याच्याजवळून पोलिसांनी २ लॅपटॉप,६ मोबाईल फोन, १ हार्डडिस्क, ६ सिमकार्ड जप्त केले आहे. मूळचा झारखंड राज्यातील एका खेड्यात राहणारा सोहराब हा झारखंड आणि बिहार मध्ये सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या चालवतो. या टोळ्या दोन्ही राज्यातील खेडे गावात बसून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहे.

(हेही वाचा – नाशिकच्या साहित्य संमेलनगीतात भूमिपुत्र असलेल्या सावरकरांचाच उल्लेख नाही!)

बँकांची के वाय सी अपडेट करणे, डेबिट कार्ड वैधता संपली, क्रेडिट कार्डवर पॉईंट मिळाले या प्रकारचे एसएमएस नागरिकांच्या मोबाईलवर पाठवण्यात येत होते, व त्याच सोबत एक लिंक पाठवून त्या लिंकला क्लिक करून तुमचा केवायसी अपडेट करा असे सांगून बँकांची माहिती काढून आर्थिक फसवणुकीचा धंदा सोहराब हा आपल्या टोळीसह झारखंड येथे चालवत होता. एकाच वेळी दोन हजार पेक्षा अधिक बल्क एसएमएस आणि लिंक पाठवून सोहराब याने अनेक बँक ग्राहक आणि राष्ट्रीयकृत बँकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी मुंबईतील पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सोहराब या सायबर गुन्हेगाराला अटक

सायबर पोलिसांनी या सायबर गुन्हेगाराचा शोध घेत हा सायबर गुन्हेगार झारखंड च्या एका खेडेगावातून हे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली असती पोलिसांनी झारखंड राज्यात जाऊन सोहराब या सायबर गुन्हेगाराला अटक केली. तो चालवत असलेली सायबर गुन्हेगाराची टोळीचा शोध घेण्यात येत असून लवकरच ही टोळी मुंबई सायबर पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here